BISWAS Nov 1 Issue 18 | Page 96

भीतीचा व्यवसाय जोरात सुरू आहे. दारू, पेट्रोल, डिझेल वर २६५टक्के इतका भरमसाठ कर वाढवून सरकारी महसुलात वाढ केल्या गेली आहे. 'न्यू वर्ड ऑर्डरची' अंमलबजावणी सुरू झाली आहे. पंतप्रधानांनी संसदेत त्याची घोषणा करून एकदाची त्यासंदर्भातील कुजबुज संपविली आहे.

माणसाची प्रतिकार शक्ती न वाढविता, कोरोनावरील प्रतिजैविकांसह स्टिरॉईड औषधाचा बेसुमार वापर केल्यामुळे कोरोनाचा व्हायरस अधिक सक्षम होत आहे आणि शरिरातील सक्षम अवयव निकामी केले जात आहेत किंवा गायब केले जात आहेत.

पहिली लाट, दुसरी लाट, कोरोना गेल्यानंतरचे दुष्परिणाम, टेस्टिंग, अनिवार्य लसीकरण आणि त्यानंतरचे दुष्परिणाम आणि मृत्यू अशा चढत्या श्रेणीचा दहशतनामा नागरिकांच्या मनात घट्ट बसविणे सुरू आहे. त्यातून नागरिकांनी बाहेर पडूच नये, याची काळजी गोदी मीडियाच्या माध्यमातून कटाक्षाने घेतली जात आहे.

पगारदारांचे पगार सुरू, शिवार ओस, दुकाने बंद, व्यवसाय ठप्प, ग्रामीण अर्थव्यवस्थेचे तीनतेरा, अच्छे दिनचे स्वप्न दाखवत बर्या दिवसाचेही केव्हाच तीनतेरा वाजविल्यानंतर सर्वच अर्थव्यवस्था संकटात आणून सामान्य माणसाला जगणेच कठीण वाटू लागावे, अशी अवस्था निर्माण झाली आहे.

तुमचा उद्योग, दुकाने कधी सुरू करायची, कधी बंद करायची, याचा हुकूम दुसरा देतो, याला पारतंत्र्य नाही तर काय म्हणायचे, त्यांनी म्हटले तेव्हा तुमची दुकाने सुरू, त्यांनी म्हटले तेव्हा बंद, आवक बंद, जावक सुरू, मग हाच नियम नोकरदारांना का नाही?

भरमसाठ शुल्क आकारून खासगी दवाखाने चालविणार्या आणि नियमबाह्यपणे आकारलेल्या भरमसाठ शुल्काची रक्कम देऊ न शकणार्या कुटुंबातील सदस्यांचा मृतदेह अडविणार्या माणसाच्या शरिरात वावरणार्या नरराक्षसांची कोरोनाने चलती केली आहे.

पाहा काय नियोजन आहे, कोरोनाची दहशत पसरविली की बेरोजगारी, शेतमालाचे भाव, दिल्लीच्या सीमेवरील सहा महिन्यांपासूनचे शेतकरी विरोधी कायदे मागे घेण्याच्या मागणीकरिताचे शेतकरी आंदोलन, विद्यार्थ्यांचे भवितव्य, जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे भाव पडले असताना देशात केलेली पेट्रोल-डिझेलवर २६५टक्के कर लावून केलेली भरमसाठ दरवाढ, असे सारेच विषय कोरोनाच्या भीतीने दुय्यम करून टाकले आहेत.

त्यामुळे कोरोना वाढवत आहेत आणि आवडत आहे, माणसा माणसात अंतर निर्माण करण्यात यश मिळविलेल्या या वर्गातील हे लोकांना, ज्या दिवशी सामान्यांना कळेल तो क्रांती दिन असेल.

बँकेतील नोकरदार वातानुकूलित कक्षात, कर्ज मागायला गेलेला अन्नदाता उन्हात मंडपात, याचे नियोजन केलेल्यांना कोरोना आवडतो.

कोरोनाच्या उपचाराकरिता काही खासगी रुग्णालयांतल्या डॉक्टरांनी भरमसाठ औषध लिहून द्यावे, त्यातील शिल्लक औषध पुन्हा त्यांनीच लावलेल्या मेडिकल स्टोअरमध्ये पाठवावे, त्यांना कोरोना आवडतो. आजीबाईचा प्रभावी बटवा विस्मरणात टाकून इम्युनिटीच्या नावाने मनात येईल त्या दराने औषध व इंजेक्शन विकणार्यांना कोरोना आवडतो.

भीतीचा व्यवसाय जोरात सुरू आहे.