BISWAS Nov 1 Issue 18 | Page 92

एक फार महत्त्वाची गोष्ट मी आपणांस सांगणार आहे तेव्हा नीट लक्ष पूर्वक आपण ती ऐकावी ही विनंती.

एक डॉक्टर म्हणून मी आपणास विचारू इच्छितो की आपण आजारी का पडतो? आजारी पडण्या मागचे कारण काय असते? कशा तर्हेने आपणच आपले डॉक्टर बनून स्वतः बरे करू शकू?

विज्ञानाच्या आधारे मी तुम्हाला सांगू शकतो की परमेश्वराने आपल्याला निर्माण केले तेव्हा त्याने आपल्या शरीराची रचना

अशा प्रकारे केली की एकतर तुम्ही आजारी पडूच नये आणि पडल्यास तुम्ही स्वतः स्वतः ला बरे करू शकता.

एवढे असून सुद्धा आपण आजारी का पडतो?

डायबेटीस, हार्टडीसीज, कॅन्सर, थायरॉईड, हार्टस्ट्रोक, ब्रेनस्ट्रो क अशा तर्हेचे आजार आपल्याला का होतात?

ह्या क्षणी हे आजार होऊच नये म्हणू न व जो आजारी आहे तो बरा व्हावा म्हणून काही करू शकतो का?

आपल्याला आश्चर्य वाटेल की देवाने आपले शरीर अशा तर्हेने बनविले आहे की त्यात त्याने जी ऊर्जा किंवा ताकद दिली आहे तिला वापरून आपण आपले शरीर निरोगी ठेवू शकतो.

ही ऊर्जा कशी वापरायची त्याचे छोटेसे उदाहरण देतो ह्यावरुन तुम्हाला समजेल की आजार कसे होतात व ते बरे कसे होतात. आपल्या समोरच्या स्क्रीनवर एकजण सायकल मध्ये हवा भरीत आहे. ती हवा टायर मध्ये जास्ती भरली गेली तरी चालणार नाही आणि कमी भरली गेली तरी चालणार नाही. म्हणजे हवेचे जे प्रमाण ठरलेले आहे त्या पेक्षा जास्ती किंवा कमी चालणार नाही. त्याच प्रमाणे आपल्या शरीरात सुद्धा प्रत्येक गोष्टीचे प्रमाण ठरलेले आहे. ब्लडप्रेशर चे, शुगरचे, थायरॉईड चे, शरीराच्या तापमानाचे प्रमाण ठरलेले आहे त्या प्रमाणाच्या बाहेर गेल्यास त्याला आजार म्हटले जाते. हे बाहेर गेलेले प्रमाण पुन्हा ठरलेल्या प्रमाणात आणायची ताकद शरीरात असते. तिचा तुम्ही उपयोग करू शकता.

आपण ब्लडशुगरचे उदाहरण घेऊया -ब्लडशुगर म्हणजे रक्तात असलेली साखर जी प्रत्येकाच्या शरीरात असते. जिवंत राहण्यासाठी प्रत्येक क्षणी आपल्याला आपल्याला ऊर्जेची गरज लागते ही ऊर्जा येते कोठून? तर ती मिळते शरीरातील सतत वाहणाऱ्या रक्तातून. ह्या रक्ता बरोबर साखरही असते तिला ग्लुकोज म्हटले जाते, ही ग्लुकोज शरीरातल्या प्रत्येक सेल मध्ये जाते व जळते त्यातून ऊर्जा निर्माण होते. ह्या साखरे शिवाय आपण क्ष ण भरही जिवंत राहू शकत नाही. कारण ती आपल्याला सतत ऊर्जा देत असते. म्हणजे साखरे ची आपल्याला गरज असते पण ती प्रमाणात. ती प्रमाणापेक्षा जास्ती झाली की त्याला

आपण म्हणतो डायबेटीस.

Dr. Biswaroop Roy Chowdhury

Transcription by

डॉ मीनल कुष्टे

एक फार महत्त्वाची गोष्ट