BISWAS Nov 1 Issue 18 | Page 131

मी माझ्या अनेक लेखांमध्ये या सगळ्या संदर्भामध्ये अनेकदा अनेक बाबी स्पष्ट केल्या आहेत. हे सर्व करण्यामागचा माझा अगदी प्रामाणिक उद्देश हा की लोकांनी याच्या आतंका मधे किंवा याच्या भया मध्ये लिप्त होऊ नये आणि जागरूकता दाखवावी. परंतु *दुर्दैवाने आमच्या देशामध्ये भयगंड फार लवकर पसरतो.

कधी एखाद्या व्यक्तींच्या मित्रो या संबोधनाला आपण फसतो तर कधी देवाचा कोप होईल या भीतीने फसवल्या जातो*. मग लोक त्याच्या नादी लागतात , नारायण नागबळी ची पूजा असो की सत्यनारायण पूजा या सगळ्या पूजा ह्या , अमुक नाही केलं तर माझं वाईट होईल किंवा मी हे केले तर मला सुख प्राप्त होईल किंवा माझ्यावरील संकट दूर होईल या मानसिकतेतून वा भयगंडातुन केल्या जातात. लस नाही घेतली तर मृत्यू या भीतीच्या सावटाखाली आणि अनेकांनी फुकट मिळते म्हणून फारसा विचार न करता लसी घेतल्या.

लोकांना मी एवढेच सांगू इच्छितो की अजूनही वेळ गेलेली नाही. हा विषय केवळ दोन लसी वर थांबणार नाही तर येणाऱ्या दिवसांमध्ये दर तीन महिन्यांनी जोपर्यंत आपण मरणार नाही किंवा विकलांग होणार नाही तोपर्यंत दिल्या जाणार आहेत. त्यामुळे यामधून वाचायच असेल तर किमान इजा, बिजा झाली आणि ईश्वराच्या कृपेने आपण ठीक आहात तर या पुढे हा मूर्खपणा करू नका, याच्या पुढचे डोस घेऊ नका आणि घेतलेत त्याच्या दुष्परिणामातुन वाचायचं असेल तर तुमच्याकडे एकच उपाय आहे तो म्हणजे तुमची स्वतःची रोग प्रतिकारशक्ती वाढवणे आणि ती रोगप्रतिकारशक्ती जर वाढवायची असेल तर विषमुक्त अन्न खाणे आणि स्वतःच आरोग्य अबाधित राखणे.

त्याकरिता "लवकर निजे लवकर उठे त्यास आरोग्य धनसंपदा लाभे" या न्यायाने वागायला सुरुवात करा. जास्तीत जास्त निसर्गाच्या जवळ जा. सकाळी लवकर उठून योग प्राणायाम किंवा किमान मोकळ्या स्वच्छ हवेत मास्क न लावता फीरा आणि त्यानंतर राम चरित मानस मधे सांगितल्या प्रमाणे प्रचार प्रसार करणाऱ्या "तप सेवा सुमिरन" ला शरण जा. त्या लोकांनी सांगितल्याप्रमाणे "दिन मे कच्चा रात मे पक्का" म्हणजे दिवसा फळं व सलाड खा आणि रात्री माफक जेवण करा, कारण मानवी शरीराची सगळ्यात जास्त शक्ती अन्न पचवण्यामध्ये खर्च होते. त्यामुळे दिवसा शिजवलेले अन्न खाऊ नका कारण आपल्याला दिवसा काम करायचं असत. खायचं असेल तर फळ आणि फळभाज्या म्हणजे सलाद खा आणि सायंकाळच्या वेळेला मनपसंत जेवण करून शांतपणे झोपा.

सध्याच्या घडीला तुमचं शरीर हे ऍसिडीक म्हणजे आम्लयुक्त झाले आहे. आजकाल आपली जी काही जीवन जगण्याची आणि खानपान पद्धत म्हणजे लाइफस्टाइल आहे त्यामुळे आपल्याला लाइफस्टाइल डिसीजेस म्हणजे मधुमेह, रक्तदाब, स्थूलपणा, इत्यादी विकार झालेले आहेत. त्यामुळे आम्लयुक्त शरीराला अल्कलाइन करणे हाच कायमस्वरूपी इलाज राहणार आहे, जो केवळ आणि केवळ निसर्गाला शरण गेले तरच शक्य आहे.

आजारी पडून हॉस्पिटलमध्ये भरती व्हायचं आणि डॉक्टरांची घर भरायची की दोन पैसे शेतकऱ्यांना अधिक देऊन शेतकऱ्यांकडून विषमुक्त अन्नधान्य मिळवायचं याचा निर्णय घेण्याची वेळ आलेली आहे. त्यामुळे सर्व लोकांना हे सांगतो की अजूनही वेळ गेलेली नाही, भारतीय शेतकरी तुमच्या मदतीला उपलब्ध आहे, त्याची मदत घ्या, त्याला शरण जा आणि स्वतःला वाचवा एवढीच सूचना मी या प्रसंगी आपल्याला करतो.

या संदर्भात अजून माहिती आणि स्पष्टता जाणून घेण्यासाठी वाटल्यास मला बोलवा, मी यायला तयार आहे. आत्मविश्वास निर्माण करणारे निरोगी जिवन जगायचे की लाचारीने रोगीष्ट जिवन जगायचे याचा निर्णय मात्र तुम्हालाच करायचा आहे.

लेखक :

प्रकाश पोहरे

संपादक: दैनिक देशोन्नती तथा

हिंदी दैनिक राष्ट्रप्रकाश व साप्ताहिक कृषकोन्नती .

98225 93921

[email protected]