BISWAS Nov 1 Issue 18 | Page 128

अमेरिकेच्या रोग नियंत्रण केंद्राने ( CDC ) आरटीपीसीआर चाचणी, ३१ डिसेंबर २०२१ नंतर बंद करण्याचा महत्वाचा निर्णय घेतला. तसे २१ जुलै २०२१ रोजीचे पत्र देशात प्रयोगशाळा व इतर संबंधितांना दिले गेले. अन्न व औषध प्रशासनाने ( FDA ) देखील अशी भूमिका घेतलीआहे असे कळते.

या यंत्रणेने कबुल केले की, आरटीपीसीआर चाचणी कोव्हिड आणि फ्लू या विषाणुंमधील भेद ओळखत नाही. याचा अर्थ गेल्या जवळपास दोन वर्षांत साध्या फ्लू च्या रूग्णांना कोव्हिडचे रुग्ण ठरवले गेले. म्हणूनच लाखो करोडोंच्या संख्येत कोव्हिड बाधितांच्या नोंदी झाल्या. या चाचणीवर अवलंबुन, हा आजार वेगाने पसरतो असे म्हटले गेले. जागतिक साथ घोषित केली गेली. भयगंड पसरला. पुढे मास्क, लाॅकडाऊन, सार्वत्रिक लसीकरण इ. अनर्थ केला. फ्लू म्हणजे कॉमन कोल्ड हा तर बहुतेक सर्वांना वरचेवर होणारा सर्वसाधारण आजार आहे. त्यामुळेच या भयनाट्यासाठी फ्लू ची कुनियोजितपणे निवड केली हे स्पष्ट झाले आहे.

आरटीपीसीआर च्या शोधाबद्दल डाॅ. कॅरि म्युलिस यांना सन १९९३ चा रसायनशास्त्रासाठीचा नोबेल पुरस्कार दिला गेला. त्यांनी स्पष्ट केले होते की, हे संशोधन डिएनए वृद्धीसाठी आहे त्याचा वापर विषाणु शोधण्यासाठी करू नये. तसे केल्यास चुकीचे निष्कर्ष येतील. असे दिसते की नेमक्या त्याच वाईट हेतूने ही चाचणी जगभर लावली गेली. झोपलेल्याला जागं करता येते परंतु झोपेचे सोंग घेतलेल्याला जागतिक आरोग्य संघटनेला जागे करता येत नाही, आणि म्हणूनच मी या संघटनेला " जागतिक रोग संघटना" म्हणतो

*युरोप अमेरिकेतील २२ नामवंत शास्त्रज्ञांचा आरटीपीसीआर चाचणी फेटाळून लावणारा अहवाल दि. ३० नोव्हेंबर २०२० रोजी आला. त्यातही हे सर्व मुद्दे नमूद आहेत. मग खुद्द जागतिक आरोग्य संघटनेने यावर्षी जानेवारी २०२१ मधे काढलेले पत्रक ही एक प्रकारे आरटीपीसीआर चाचणी ही चूक असल्याची कबुली आहे. मात्र आजही ही चाचणी भारतात सर्रास केली जात आहे आणि लाखोंना संकटात लोटले जात आहे.

लाखोंची आरटीपीसीआर टेस्ट केली की खोटे पाॅझिटिव्ह रूग्ण मोठ्या संख्येने मिळतात. मग लाट आल्याचे घोषित होते. माणसे भीतीने, कोव्हिड हाॅस्पिटलमधे एकटे पडल्याने निराशेने, रेमडेसिविर सारखी औषधे, नव्हे विषे दिल्याने आणि "खोट्या आजारावर खोटे उपचार" झाले म्हणून मरण पावली. खरी कारणे न समजल्याने कोरोनाची भीती वाढत गेली.

गतिमान जीवनशैली मुळे समाजात उपभोगवाद बोकाळला, परिणामी रोगप्रतिकार शक्ती कमी झाली. पैसा हे जगण्याचे उद्दिष्ट बनले आणि ज्ञान- विज्ञानाकडे पाठ फिरवली गेली. प्रेम विश्वास उरला नाही. असा समाज रोगाला आणि दिशाभूलीला सहज बळी पडतो.