BISWAS Nov 1 Issue 18 | Page 117

भावना- आपले प्रेक्षक आपले पेशन्ट ह्यांचा आपल्यावर पूर्ण विश्वास आहे, याचे कारण आपण कोणतीही गोष्ट सांगताना पुराव्यानिशी सांगता. पण बरेचशी वृत्त पत्र म्हणतात की आपण करोना वा तिची लस ह्या बाबतीत लोकां ना गोंधळवून टाकता. आपल्या व्यक्तिमत्वाला काळेरूप देतात. तर अशा मीडिया बद्दल आपण काय सांगाल?

डॉक्टर- मीडिया वरचा लोकांचा विश्वास उडत चालला आहे, गोदी मीडिया ह्या लोकांनी दिलेल्या नावावरून ते समजते, एक वर्ष झाले ह्या गोदी मीडियाला. लोकांचा मीडिया वरचा उडालेला विश्वास मी आयुष्यात प्रथमच पहात आहे. आजवर मीडियावर प्रश्न उठलेले माझ्या बघण्यात आलेले नाही. मीडियावर लोकांचा विश्वास नाही हे त्यांच्या गोदी मीडिया ह्या नावावरूनच समजते. व त्याचे हे खोटे कारनामे लोकांचा त्यांच्या वरचा विश्वास उडायला कारणीभूत आहेत. लोक आता ह्यांना सोडून यु ट्यूब, व इतर छोटया स्वतंत्र चॅनलकडे वळत आहेत, छोट्या पत्रकारांच्या बातम्या जास्त बघत आहेत. खूप न्यूज चॅनल बंद होत आहेत, मला ज्या पत्रकारांनी कमी लेखल, माझी टिंगल टवाळी केली ते पत्रकार आज बेकार झालेत त्यांना नोकरी नाही. त्यांच्या कर्माने ते मरणार आहेत. त्यांची काळजी करण्याची आज गरज नाही, आम्हाला लोकांपर्यंत खरं पोहोचवायचे आहे त्यासाठी पुराव्याची गरज असते. खऱ्याला जरी उशीर लागला तरी ते लपून रहात नाही.

भावना- आपल्या दर्शकांचे आपल्यासाठी काही खास प्रश्न आहेत ते जाणून घेऊ इच्छितात की स्वस्थ रहाण्यासाठी, तंदुरुस्त रहाण्यासाठी योग करणे किती योग्य आहे?

डॉक्टर- योग करणे ही चांगली गोष्ट आहे. योग केल्याने माणूस लवचिक रहातो, योग केल्याने शिस्त लागते. प्राणायम करावा, कोणताही व्यायाम करावा ज्याच्यामुळे आपल्याला घाम येतो, दम लागतो ह्यात जॉगिंग करा, स्वि मिग करा, डान्स करा, बॅट मिंटन खेळा. योग एवढ्यासाठी की वयस्कर माणसे व लहान मुलेही करू शकतात, छोट्या जगेतही करता येतो. व त्या मुळे माणूस शरीरीम व मानसिक रित्या तंदुरुस्त रहातो. कोणताही व्यायाम करा नियमित 15 ते 20 मिनिटे घाम येईस्तोवर तो करा. आणि हाच शिरस्ता ठेवावा.

भावना- आपण योगला जास्ती पाठिंबा देता. म्हणूनच मी हे जाणून घेऊ इच्छिते की योग केल्यामुळे चिंतेवर मात करता येते का?

डॉक्टर- योगात श्वासोच्छवासावर नियंत्रण ठेवता येते. श्वासाचे व चिंतेचा संबंध आहे. चिंता असल्यास श्वासोच्छवास अनियमित होतो. जेव्हा तुम्ही चिंतेत असता तेव्हा तुमचा श्वासोच्छवास व तुमच्या हृदयाचे ठोके अनियमित होतात. जेव्हा तुम्ही चिंतेत असाल, काळजीत असाल तेव्हा प्राणायाम सुरू करा, चिंता नाहीशी होईल. त्यामुळे चिंता हवी असेल तर प्राणायाम करू नका.

भावना - उपरोधिक रित्या आपण सर्वांना व्यवस्थित मार्गदर्शन केलेत. आपल्याला जर नैराश्य आले असेल किंवा चिंता वाटत असेल तर योग करणे. डॉक्टर साहेब आपण इथे आलात व आमच्या दर्शकांचे शं का निरसन केलत त्या बद्दल खूप खूप आभार.

डॉक्टर- धन्यवाद

प्रतिलेखन

डॉ मीनल कुष्टे

मीडिया वरचा लोकांचा विश्वास उडत चालला आहे,