BISWAS Nov 1 Issue 18 | Page 116

भावना- जेवढी माणसे दहशती मुळे आजारी पडत असतील तेवढी करोना मुळे ही नसतील

डॉक्टर- हे तर आपण बघतोच आहोत. एखादा निरोगी माणसाची टेस्ट करून तो करोना +ve आहे असे सांगितले , चार वेळा ही टेस्ट केल्यास दोन वेळा ती+ve येणार दोन वेळा _ve येणार. त्याने हे घरी सांगितल्यावर अशी वातावरण निर्मिती होते की त्याला घरात घेतले जात नाही. त्या वेळी त्याची मनस्थिती अशी असते की लहानपणी तुम्ही परीक्षेत नापास झालात किंवा तुम्हाला हेडमास्तर ने बोलावले तर भीतीने तुमच्या हृदयाची धडधड वाढते, काही सुचत नाही, सगळं संपलाय असे वाटते हा सगळा रोगप्रतिकार शक्ती संपविण्याचा खेळ आहे म्हणजे भीती माणसाला संपवते.

भावना- तुम्हाला आयुष मंत्रालया संबंधी विचारायचे आहे, तुमची NIC ची कार्यपद्धती त्यांना मान्य नाही का? कारण अशी अफवा उठली होती की आपली कार्यपद्धती आयुष मंत्रालयाला मान्य होती. या बद्दल आपण काय सांगाल?

डॉक्टर- ही अफवा त्यांनीच उठवली होती. खरी गोष्ट अशी आहे की, आयुष मंत्रालयाचा एक विभाग NIN आयुष मंत्रालय ही लोक आमच्या करोना सेंटर मध्ये आली होती, त्यांनी आमच्या कार्यपद्धती प्रमाणे आजाऱ्यांवर होणारा उपचार पहिला, त्याचा अभ्यास केला व त्याचा अहवाल 20 जुलै ला सादर केला त्याची कॉपी आपल्याला biswaroop.com/aayush लिंकवर बघायला मिळेल.

ह्या अहवालात ते सुचवितात (हे लेखी आहे) की, आमच्या पहाण्यात आलेली ह्यांची कार्यपद्धती खूप चांगली आहे, ह्या मध्ये ना औषधांची गरज , ना कसले दुष्परिणाम , ना कोणी आजारी झाले ना कोणी दगावले. येथे असलेले सर्वजण तीन ते सात दिवसात बरे झाले. त्या मुळे आम्ही सुचवीत आहोत की भविष्यात ही कार्यपद्धती कोवीडच्या सौम्य, कमी तीव्रतेचे व गंभीर आशा तिन्ही पेशन्ट साठी योग्य आहे. तसेच रोगाचा प्रतिबंध कसरण्यासाठी सुद्धा ही कार्यपद्धती वापरता येईल.

त्यांनी लेखी दिल्या नंतर आम्ही लोकांना सांगितल्यावर त्यांच्या मंत्रालयाला काय झाले माहीत नाही, किंवा त्याच्यात आपसांत एकवाक्यता नसावी. त्या नंतर त्यांनी एक पत्रकार परिषद घेऊन त्यात त्यांनी जाहीर केलं की आम्ही असं काही सुचविलेलंच नाही. एका बाजूला पत्र लिहून ते मला माझी शिफारस केल्याचे सांगतात, तर दुसऱ्या बाजूला शिफारस केली नसल्याचे सांगतात. हा व्हिडिओ बघणार्यांनी आयुष मंत्रालयाला विचारले पाहिजे की तुम्ही शिफारस दिल्याचे पत्र असताना शिफारस न दिल्याचे का सांगत आहात? पत्र जर खोटे असेल तर त्यावर कारवाई व्हायला हवी. खोटी ती लोक आहेत मी नाही.

ह्यांची कार्यपद्धती खूप चांगली आहे, ह्या मध्ये ना औषधांची गरज , ना कसले दुष्परिणाम , ना कोणी आजारी झाले ना कोणी दगावले. येथे असलेले सर्वजण तीन ते सात दिवसात बरे झाले. - NIA