BISWAS Nov 1 Issue 18 | Page 110

WHO च्या चुकीच्या प्रोटोकॉलमुळे माणसे किड्यामुंग्यासारखी मरत असताना IMA ने आणि त्यांच्या सदस्य डॉक्टर मंडळींनी त्यावर काहीही बोलू नये आणि जे बोलले त्यांना मान्यता रद्दची धमकी द्यायची, काही प्रामाणिक डॉक्टर बोलले तर त्यांच्याकडे IMA , ICMRआणि सरकारने सुद्धा दुर्लक्ष करणे, त्यामुळे देशात आणि विशेषतः महाराष्ट्रातही औषध कंपन्यांची दुकानदारी चालविणार्या 'WHO' च्या इशार्यावर राज्य चालतेय याचे तुम्हाला आश्चर्य वाटत नाही का?

देशातील इलेक्ट्रॉनिक मीडियासुद्धा कोरोना या विषयावर अशाच प्रकारे सरकारी प्रसार आणि प्रचारामध्ये सामील झालेला दिसतो, सोशल मीडिया मात्र या सगळ्या संदर्भामध्ये बर्यापैकी जनजागृती आणि वेगळी मते मांडताना दिसतो हाच काय तो एक आशेचा किरण.

गेल्या काही वर्षांमध्ये सत्ताप्राप्तीसाठी भारतीय जनता पक्षाने सांसदीय राजकारणाला ज्या विधिनिषेधशून्य पद्धतीने खीळ घालण्याचा प्रयत्न केला आहे, तोच प्रयोग आज सगळेच विरोधी पक्ष करत असल्याचे दिसून येते; नव्हे सत्ताधार्यांना थेट सहकार्य करीत असल्याचे दिसून येते. विरोधी पक्षाची आक्रमक, पण विधायक भूमिका अलीकडच्या दोन दशकांमध्ये बहुतेक सर्वच विरोधी पक्ष विसरले आणि कोरोनाकाळात तर बहुतांश विरोधी पक्ष मृतप्रायः झाल्याने तुम्हाला आश्चर्य वाटत नाही का?

कोरोना विषाणूची तथाकथित जागतिक साथ, पण सत्ताधारी आणि विरोधकांच्या राजकीय खेळीत होरपळणारी भारतीय जनता, ही एक प्रदीर्घ कादंबरी आहे. यातील काही प्रकरणेच फक्त आपण उलगडली आहेत. भविष्यात अजून किती प्रकरणे उद्भवतील आणि पाने चाळावी लागतील याची कल्पना कोणालाच नाही. सध्यातरी लसीकरण आणि त्या परिणामी येणारी तिसरी लाट आणि त्यांच्या माध्यमातून होणारी सामूहिक लूट त्यामुळे भविष्यात ज्या घटना घडतील याचे तुम्हाला आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही.

ज्यांना भविष्याचा वेध घेता येतो अशांची एकजूट हाच यावर उपाय आहे.

फेसबुकवर प्रहार

वाचण्यासाठी:PraharbyPrakashPohare

आणि ब्लॉगवर भेट देण्यासाठी

Prakashpoharedeshonnati.blogspot.in

टाईप करा.

प्रतिक्रियांकरिता:

Email: [email protected]

Mobile No. +९१-९८२२५९३९२१

कोरोनाकाळात तर बहुतांश विरोधी पक्ष मृतप्रायः झाल्याने तुम्हाला आश्चर्य वाटत नाही का?