BISWAS Nov 1 Issue 18 | Page 109

ही लस दिल्यावर होणारे दुष्परिणाम किंवा तिच्यामुळे येणार्या रिअॅक्शन्स, साईड इफेक्ट्स आता लोकांना जाणवू लागले आहेत. लोकांचे जीव जाताहेत. नागरिक कोरोनाचे सुपर स्प्रेडर बनत आहेत, पण विरोधी पक्षातल्या कुठल्याच पक्षाने यावर आवाज उठवला नाही, हे तुम्हाला खटकत नाही का?

देशाच्या राजकारणात सध्या जे काही सुरू आहे, ते मन उद्विग्न करणारे आहे. आतापर्यंत सत्ताधारी आणि विरोधी अशा दोन्ही बाजूंकडून 'मला संसदेत बोलू दिले जात नाही' असा टाहो फोडला जायचा. आरोप-प्रत्यारोपांचा अक्षरशः कोलाहल माजवला जायचा, पण कोरोना महामारीबाबत सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात एकमत दिसून येते, हेच आश्चर्यजनक आहे.

आतापर्यंत दिलेल्या आश्वासनांच्या अंमलबजावणीत आलेल्या अपयशामुळे जनतेच्या प्रश्नांना तोंड देणे सत्ताधार्यांच्या 'आंतरिक हिता'चे नाही म्हणून कोरोना आणि लॉकडाऊन हे षड्यंत्र सरकारने रचलेले आहे. मात्र, विरोधकांच्या मूग गिळून बसण्यामागे काय दडले आहे, हेच कळेना? विरोधी पक्षांची चुप्पी पाहून म्हणूनच 'हे सारे एकाच माळेचे मणी आहेत', असे म्हणण्याशिवाय पर्याय उरत नाही.

अजून एक महत्त्वाची बाब अशी की, महाराष्ट्रात पारनेरचे राष्ट्रवादीचे म्हणजेच सत्ताधारी पक्षाचे आमदार नीलेश लंके यांनी सुरू केलेल्या कोविड केअर सेंटरची चर्चा देशभर सुरू आहे. पारनेर तालुक्यातील भाळवणी येथे नीलेश लंके यांच्या पुढाकारातून शरद पवार यांच्या नावाने कोविड केअर सेंटर चालवण्यात येत आहे. या सेंटरमध्ये आमदार लंके स्वत: मुक्काम ठोकून काम करत आहेत, तिथे कोणी मास्क लावत नाही, सॅनिटायझर वापरत नाही, ऑक्सिजन सिलिंडर व कुठलीही अॅलोपॅथिक औषधी रुग्णांना दिल्या जात नाही, कुठलेही डिस्टन्सिंग नाही; केवळ आणि केवळ खाणपानावर लोकांना मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढून रुग्णांना भयमुक्त करण्यात येत आहे. जगप्रसिद्ध डायटिशियन तथा न्युट्रीशनिस्ट डॉ.बिस्वरुप रॉय चौधरी यांच्या 'NICE' संस्थेच्या तांत्रिक सहकार्याने हे कोविड केयर चालविल्या जात आहे. मात्र, याकडेही कुणाचेच लक्ष नाही. देशभरात डॉ.बिस्वरुप रॉय चौधरी, डॉ.तरुण कोठारी, डॉ.के.बी.तुमाणे, डॉ. उमेश कोठारी, डॉ. उत्तम माहेश्वरी, डॉ. विलास जगदाळे, डॉ. लिओ रिबेलो यांसारखी अनेक नामवंत डॉक्टर आणि तज्ञमंडळी सांगत आहेत, की कोरोना हा संसर्गजन्य आजार नाही, तो निसर्गोपचाराने त्वरित बरा होणारा साधा सर्दीपडशाचा आजार आहे आणि नीलेश लंके यांच्या कोविड केयर सेंटरने या सगळ्या बाबी सिद्ध केल्या. माझ्यासारखे लाखो, करोडो लोक मास्क न लावता काम करत आहेत, कोरोनाच्या वॉर्डात जाऊन भेटी देत आहेत आणि जिवंत आहेत; परंतु याकडेही महाराष्ट्रातील सत्ताधारी किंवा केंद्रातील विरोधी पक्ष का दुर्लक्ष करीत आहेत? हे सगळे तुम्हाला आश्चर्य वाटत नाही का?