BISWAS Nov 1 Issue 18 | Page 108

'हाफकीन' संस्थेने पुढे पोलिओवरील लसीबाबत केलेले कार्य जगभर नावाजले गेले आहे. जगातील ४५ देशांत ही लस पोहोचली. धनुर्वात, सर्पदंश, विंचूदंशावरील लस संशोधनासाठी 'हाफकीन' संस्था नावाजली जाते. आशिया खंडात आढळून येणारा कोणताही साप चावला तरी 'हाफकीन' संस्थेने शोधलेली लस त्यासाठी चालते, पण 'कोरोना'वरील लसनिर्मितीसाठी 'हाफकिन'ला परवानगी का दिली नाही, हा प्रश्न विरोधी आघाडीतील कोणत्याच पक्षाने विचारला नाही. 'सीरम' इन्स्टिट्यूटला लसनिर्मितीचे कंत्राट देण्यामागचे गौडबंगाल तर न समजण्यासारखे आहे.

आता प्रश्न आहे, की 'कोविशिल्ड'चा शोध लावणारे नेमके कुठल्या इन्स्टिट्यूटचे वैज्ञानिक आहेत? त्यांचे नाव आणि चेहरा कोणी पाहिला आहे का? इतक्या भयंकर महामारीवर लस शोधून काढणारे ते वैज्ञानिक डोळ्याने दिसायचे तर दूर, त्यांची नावेही आपण कोणाच्या तोंडून ऐकलेली नाहीत. लसनिर्मितीसाठी कच्चा माल (Raw Material) कुठून आयात होतो? काय विरोधी पक्षांनी हे सरकारला विचारले? हे सगळे तुम्हाला आश्चर्यकारक वाटत नाही का?

आतापर्यंत कोणत्याही आजाराच्या लसी अस्तित्वात आणण्यासाठी चार-पाच वर्षे किंवा त्याहीपेक्षा जास्त काळ प्रदीर्घ प्रयत्न करावे लागल्याचे आपण पाहिले आहे.

एचआयव्ही-एड्सची लस आज तीस-चाळीस वर्षे झाली तरी येऊ शकलेली नाही. तरीसुद्धा कोरोनाच्या जगद्व्यापी संकटात ही लस कोरोना येण्यापूर्वीच विकसित कशी झाली आणि तिचे ५ कोटी डोस कसे तयार करण्यात आले? आणि तेसुद्धा अशा रोगावर, की ज्या रोगावर अॅलोपॅथीमध्ये औषध नाही. तरीही ही लस बाजारात आणण्यासाठी इतकी घाई कशी केली गेली? ही लस देणार्या डॉक्टरांनासुद्धा खात्री नाही की ती कितपत उपयुक्त ठरेल, ती परत केव्हा घ्यावी लागेल आणि ती घेतल्यावर त्याचे कोणते दुष्परिणाम दिसतील? हे सगळे आश्चर्यकारक नाही का?

पुन्हा कोरोना लसीसंदर्भातील एका धक्कादायक माहितीकडे तर सगळ्यांनीच दुर्लक्ष केलेय. देशात तीन लसींना मान्यता देण्यात आली आहे. त्यातील कोव्हॅक्सिन लस, ज्या लसीला सर्वात जास्त मागणी आहे, ती लस गायीच्या वासराच्या रक्तातील घटकांपासून तयार केली जाते. केंद्र सरकार आणि लसीच्या कंपनीने आरटीआयमध्ये याचा खुलासा भारत बायोटेकने केला आहे.

विशेष म्हणजे हे गोरक्षेचा ठेका घेतलेल्या भारतीय जनता पक्षाच्या सत्ताकाळात घडले आहे. तरीही यावर विरोधी पक्षातील कोणीच अवाक्षरही काढताना दिसत नाही, हे सगळे तुम्हाला विस्मयकारक वाटत नाही का?