BISWAS Nov 1 Issue 18 | Page 103

येत्या जानेवारीपासुन नवी चाचणी पध्दती लावली जाईल असे दिसते. पण आरटीपीसीआर फाॅल्स पाॅझिटिव्ह म्हणजे बाधा नसलेल्यांना बाधा आहे असे नोंदत आली असल्याने जागतिक साथ घोषित झाली होती. ती ९७% चुकीचे निर्णय देत होती हे वास्तव मान्य करून जागतिक साथीची घोषणा व त्याबरोबर सर्व बंधने आणि लसीकरण मागे घेतले पाहिजे.

ही अथ पासुन इति पर्यंत फसवणुक आहे. "कोव्हिड- १९ नावाचा विषाणु व अर्थातच त्याची साथ अस्तित्वात नाही", असे म्हटल्यावर ऐकणाराचा विश्वास बसत नाही, इतके जनतेला भ्रमात टाकले आहे. विज्ञानाच्या नावाने अशी जागतिक पातळीवरील, अक्षरशः जीवघेणी नियोजित फसवणूक इतिहासात झाली नाही.

जनतेने प्रसारमाध्यमांकडे आपले डोके गहाण ठेवले आहे. यापुढच्या टप्प्यात भारतात खोट्या तिसऱ्या लाटेचा प्रयोग करण्यात येईल असे चिन्ह आहे. तसे झाल्यास भारतीयांच्या पुढच्या पिढ्या कायमच्या उध्वस्त होतील. या लसी जनुकीय बदल घडवतात. निर्माण होणारी व्यंगे, आजार, वंध्यत्व इ. दोष पुनरूत्पादनाद्वारे पुढील पिढ्यांमधे विवाहांद्वारे संक्रमित होतील. मग यासंदर्भात लस न घेण्याला अर्थ उरणार नाही.

लेख वाचुन गप्प राहू नका. कृपया राजकारणी, नेते, नोकरशहा आणि जनतेला जागं करण्यासाठी झटुन प्रयत्न करा. लस घेतलेल्यांना असे वाटत आहे की, आता स्वातंत्र्य परत मिळेल, परंतु तसे होणार नाही. इझ्रायलमधे जवळजवळ सर्वांनी दोन वा तीन लसी घेतल्या. तरी आता त्यांना दर सहा महिन्यांत एकदा लस घ्यावी लागेल असे सांगण्यात येत आहे. मानवजातीला नियंत्रित गुलाम करण्याचा व लुटण्याचा खास अभिनव मार्ग जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्फत हाताळला जात आहे. त्यापलिकडे या लसींमुळे मानवसंहाराचा कार्यक्रम पार पाडला जात असल्याचा स्पष्ट आरोप डाॅ. मायकेल यिडाॅन, डाॅ. जुडी मायकोविटस, डाॅ. जेन रूबी इ. अनेक मान्यवर शास्त्रज्ञांनी केला आहे. अमेरिकेतील जागृत डाॅक्टरांच्या आघाडीने श्वेतपत्रिकेत हा अंदाज नमूद केला आहे की, पुढील पाच वर्षांत अमेरिकेतील सुमारे ३०% माणसांचा कोव्हिड लसीकरणामुळे मृत्यू होईल.

हे अवैज्ञानिक आणि गुन्हेगारी स्वरूपाचे लसीकरण आणि त्याकडे नेणारी आरटीपीसीआर चाचणी तात्काळ थांबवण्याची आणि कोव्हिड प्रकरण गुंडाळण्याची मागणी जगातील नामवंत शास्त्रज्ञ सतत करत आहेत.

भारतीय जनतेचा मोठा घटक संमोहनात आहे किंवा अगतिक बनला आहे. या अवस्थेतुन तातडीने बाहेर येणे आवश्यक आहे. निर्णय घेणारांना गदगदा हलवण्याची गरज आहे. राजकारण, मनोरंजन वा इतर कोणतीही गोष्ट यापेक्षा महत्वाची नाही.

"जेव्हा सर्व एकसारखा विचार करतात तेव्हा

कुणीही खोल विचार करत नाही" .

-वाॅल्टर लिपमन ( दोनदा पुलित्झर पारितोषिक विजेते )

आपला

अॅड. गिरीश राऊत

निमंत्रक

भारतीय जीवन व पृथ्वीरक्षण चळवळ

दू. ९८६९ ०२३ १२७