BISWAS Nov 1 Issue 18 | Page 98

कोरोनाची दहशत पद्धतशीर पसरवून या दहशतीने जगणे हैराण करून टाकले. ही दहशत निर्माण केली गेली. 'कोरोनाने किती जण दगावले, हे स्पष्टपणे सांगा, जे दगावले ते कोरोनाच्या दहशतीनेच दगावले आहेत किंवा चुकीच्या औषधोपचारामुळे, या संदर्भात डॉ. तरुण कोठारी, डॉ. विश्वरूप चौधरी यांनी दिलेली आवाहने मुद्दाम हेतुपूर्वक दुर्लक्षित केली जातात.'

पगारदारांची चंगळ सुरू आहे, जनसामान्यांचे अमंगळ सुरू आहे. 'नवा राजा सांगतो, ताटे वाजवा, लाईट विझवा', आम्ही रोबोटसारखे वागतो. ताटे वाजवितो, लाईट विझवितो, त्यांनी दिलेल्या धान्यावर जगतो, तुमच्या माइंड कंट्रोलचे नियोजन केले गेले आहे तेही एका सर्दी- पडशासारख्या आजाराच्या मोठ्या भावाने.

केवढी दहशत माजविली आहे कोरोनाने, मग कोरोना आवडतो कोणाला, याचा विचार करा, भानावर या, स्वतंत्र भारतात जगताना पारतंत्र्य स्वीकारू नका. कोरोना आवडतो कोणाला, हे स्पष्ट झालेच असेल.

एकांगी व अचानक लॉकडाऊन करणे मुळातच चुकीचे होते व आहे, त्यामुळे करोडो लोकांना हजारो किलोमीटर पायपीट करावी लागली, कित्येक मेले. ज्यांना खरंच पोटापाण्याची सोय करण्याची गरज आहे त्या लोकांना बाहेर पडणे गरजेचे असते. अशा लोकांनी घरात राहून त्यांच्या कुटुंबाला कसे पोसायचे?कोरोनापेक्षा उपासमार होण्याची शक्यता जास्त बळावली आहे. प्रत्येक व्यक्तीला स्वतःचा जीव प्रिय असतो. म्हणून प्रत्येक जण स्वतःची काळजी घेणार हे ठरलेले आहे. त्यामुळे पूर्वी जसे होते तसेच सर्व व्यवहार चालू ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. लॉकडाऊन केल्यामुळे कोरोना कमी होण्यासाठी काही फरक पडत नाही हे वारंवार सिद्ध झाले आहे. लहान मुलांच्या शाळा कॉलेज बंद ठेवल्यामुळे त्यांचे भवितव्य अंधकारमय झाले आहे. सर्व व्यवहार नेहमीप्रमाणे चालू व्हायला हवे. ज्याला स्वतःची काळजी घ्यायची आहे तो काळजी घेणारच आहेत. उगाच लॉकडाऊन करून काहीच उपयोग होणार नाही. उलट यामध्ये देशाचे आणि देशातील जनतेचे प्रचंड नुकसान झाले आहे आणि होत आहे. प्रत्येकजण स्वतःची काळजी घेण्यासाठी समर्थ आहे. जनावरांसारखे त्यांना घरात कोंडून ठेवण्याची गरज नसते. प्रत्येकाला आपापले भले समजते.

जगातील बहुतेक देशांतील माणसे आता शहाणी झाली आहेत आणि त्यांना कोरोनाच्या नावाखाली हे कट-कारस्थान कोणी आणि का रचले याची जाणीव झाली आहे आणि त्यांनी हे सर्व झुगारून देऊन ते रस्त्यावर आले आहेत. भारतात मात्र यासंदर्भात अजूनही लोक भीतीच्या सावटाखाली आहेत आणि ते तसे राहावे याची तरतूद पहिली लाट, दुसरी लाट, आणि आता लहान मुलेसुद्धा बळी पडतील, असे सांगत वातावरण निर्मिती केली जात आहे.

'इनफ इज इनफ'अशी इंग्रजीत एक म्हण आहे आणि त्या दृष्टीकोनातून मी लोकांना सांगू इच्छितो की जगात आजूबाजूला काय चाललेय ते बघा आणि त्या दृष्टीकोनातून वागायला लागा, अन्यथा तुमची पुढची पिढी तुम्हाला माफ करणार नाही.

फेसबुकवर प्रहार वाचण्यासाठी: PraharbyPrakashPohare

आणि ब्लॉगवर भेट देण्यासाठी Prakashpoharedeshonnati.blogspot.in टाईप करा.

प्रतिक्रियांकरिता: Email: [email protected]

Mobile No. +९१-९८२२५९३९२१

तुमची पुढची पिढी

तुम्हाला माफ करणार नाही.