BISWAS Nov 1 Issue 18 | Page 133

काल परवा शेतात गेलो होतो..

धूर्यावर,बांधावर आंबा, बिबी च्या झाडाला पारसा दोडका वेल लपेटलेली दिसले.

त्या वेलीला लदबद दोडकी लागलेली होती.

सर्व चांगली/ शाबुत कच्ची खावी अशी... कोवळी, निब्बर..

(उंच असल्याने तोडता येत नव्हती.)

शिकलेल्या लोकांना माझा प्रश्न:

ही सगळी सहा-सात वेल आढाव आहेत.

याला खत कोणी घातलं, निंदन कोणी केलं, पाणी कोणी घातलं, फवारणी कोणी केली अर्थात.. नाहीच.

तरीही वेल लदबद कशी...?

यातून एक गोष्ट समजून घेतली पाहिजे निसर्ग हा हवा, पाणी ,सूर्यप्रकाश पंच तत्व यांनी बनला आहे.

संकरित वान व अनावश्यक केमिकल्स ,पेस्टिसाइड या सर्व गोष्टीमुळे आपण आपलच जीने हराम करून टाकले..

शुगर, कॅन्सर, अटॅक ई गोष्टी आपल्या जगण्याचा अविभाज्य घटक बनत आहेत.

Cluster farming

निसर्ग तत्वांची जपणूक