BISWAS Nov 1 Issue 18 | Page 124

एकीकडे लसीकरण ऐच्छिक असल्याचे केंद्र शासनाकडून सांगितले जात असले तरी राज्यातील गोम वेगळीच आहे हे नागरिकांनी लक्ष्यात घेऊन सक्तीच्या लसीकरणाविरुध्द एल्गार पुकारावा. स्वस्त धान्य दुकानावर एकत्रित होऊन प्रशासनाचे डाव हाणून पाडावेत असे आवाहन पोहरे यांनी केले आहे.

शाळा, महाविद्यालयात प्रवेश नाकारला जात असेल तर विद्यार्थी, पालकांनी त्याला विरोध करावा. तर संबंधित शाळा मुख्याध्यापक, महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ खेळणार्या शासकीय कृतीचा निषेध नोंदवून प्रशासनाच्या या सक्तीच्या लसीकरणाचा डाव हाणून पाडावा. असे आवाहन कोरोना षडयंत्राविरोधात आघाडी उघडलेल्या प्रकाश पोहरे यांनी केले आहे.

* पोहेरे शाळा, महाविद्यालयांना स्वतः भेट देतील*

सक्तीच्या लसीकरणाविरोधात जागृत पालक व विद्यार्थ्यांनी सोमवार दिनांक १ नोव्हेंबरपर्यंत संपर्क साधल्यास मंगळवार, दिनांक २ नोव्हेंबर रोजी शेतकरी नेते प्रकाश पोहेरे स्वतः जातीने संबंधित शाळा, महाविद्यालयांना भेट देऊन विद्यार्थी व पालकांना साथ देण्यासाठी येवू शकतात. तसेच मुख्याध्यापक, प्राचार्य यांच्यासोबत संवाद साधून या सक्तीच्या लसीकरणावरणाच्या विरोधात उभे राहण्याची गळ घालणार आहेत. विद्यार्थी, पालकांनी जागरूकतेने या आंदोलनात सहभागी होऊन सक्तीच्या लसीकरणाचा डाव हाणून पाडावा, असे पोहरे यांनी आवाहन केले आहे.

... तर संपर्क साधा

रेशन घेतांना किंवा शाळा कॉलेज मध्ये प्रवेश घेतांना लसीकरणाची सक्ती करण्यात येत असेल तर या लसीपासून होणार्या संभाव्य नुकसानीची जबाबदारी स्वीकारणारा मजकूर संबंधित यंत्रणा, घटकांकडून लिहून घ्या.

यामध्ये काही अडचण आल्यास किंवा यंत्रणेकडून टाळाटाळ होत असल्यास ९५५२५ १०७८० आणि ९५५२५ १०७८१ या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा, असे आवाहन सुद्धा पोहरे यांनी केले आहे.

पोहेरे शाळा, महाविद्यालयांना स्वतः भेट देतील