BISWAS Biswas 20 | Page 119

दाने दाने पे लिखा है खाने वाले का नाम हे वाक्य आपण खूप वेळा ऐकतो पण ह्या वाक्याचा खरेपणा1999साली गुंटूर प्रोबेल ने ते वैज्ञानिक दृष्ट्या सिद्ध केलं त्या साठी त्याला नोबेल पारितोषिक ही मिळाले. आता तर विज्ञान ही मान्य करते की अन्न आपल्याशी बोलते.

जनावर आजारी पडले तर सरळ ते गवतात जाते, गवत खाते. वाघ आजरी पडला वेगवेगळी पाने निवडतो व आपल्या आजारावर उपयोगी पडणारी पाने खातो व बरा होतो. पाळीव कुत्रे, मांजरी आजारी पडली तर सरळ घराबाहेर पडतात गवतात जातात, गवत खातात, गवतात लोळतात, उलटी करतात व बरी होतात. मात्र माणूस काय करतो तर तो ही आजारी पडला तर घराबाहेर पडतो, व सरळ डॉक्टर कडे जातो.

माणूस जन्माला येतानाच स्वतः ची एक कार्यपद्धती घेऊन येतो जी त्याला परमेश्वराने दिलेली असते. जी कार्यपद्धती आपल्याला आजारा पासून बरे करते व दीर्घायु देते. उदाहरणार्थ डोळ्यात फुक मारल्यास पापण्या आपोआप बंद होतात. ह्यालाच परमेश्वराने दिलेली कार्यपद्धती म्हणतात. नुकत्याच जन्मलेल्या मुलाला आईचे दूध कसे प्यायचे ते माहीत असते. ही कार्यपद्धती

शिकण्याची गरज नसते. कोणत्याही आजारापासून स्वत:कसे बरे करायचे हे जसे जनावरांना माहीत असते तसे ते माणसालाही माहीत असते, पण माणूस ते विसरत चालला आहे. आपत्कालीन परिस्थितीत प्राणी मरत नाहीत माणूस मात्र मरतो. मात्र ज्या प्राण्यांना गोठ्यात बांधून ठेवलेले असते ती मात्र मरतात. 1974,75 साली चीन मध्ये भूकंप झाला होता पण तो होण्याआधी तिकडची सर्व जनावरे पळून गेली, माणसांनी जनावरांना पळतांना पाहिले तेव्हा त्यांना वाटले की ज्या अर्थी जनावरे पळत आहेत त्या अर्थी काही भयंकर घडणार आहे, दीड लाख लोकांनी ते शहर सोडले. भूकंप झाला पण कोणी मेल नाही. हा इतिहास आहे. याचाच अर्थ भूकंप होण्याआधी जनावरांना त्याची चाहूल लागते व ते पळून जातात. याचाच अर्थ आपल्यात जन्मत:च काही कार्यपद्धती असते.

जनावरांना कधी हार्ट अटॅक होत नाही. पण ज्यांच्या घरात पाळलेला कुत्रा अगर मांजर असेल आणि त्या घरात कोणाला हार्ट अटॅक येणार असेल तर काही तास अगोदर ते पाळीव जनावर विचित्र वागू लागते, ते सूचना देऊ लागते.

परदेशात असे खास शिकविले ले कुत्रे असतात, हार्ट अटॅक ची बाधा झालेला मनुष्य अशा कुत्र्यांना कोठेही ने शकतो. हे कुत्रे अटॅक येण्या अगोदर काही तास सूचना देतात. ही अंतप्रेरणा साऱ्या जनावरांमध्ये असते, माणसा मध्येही असते. ते कसे समजायचे? ते जर आपल्याला समजले तर आपला आयुष्याचा प्रवास सोपा होईल.

डॉ मीनल कुष्टे

अन्न आपल्याशी बोलते.